कोलकाता डॉक्टर प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. पोलिसांनी आरजीच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख आणि सहायक अधीक्षकांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावलं आहे.
कोलकाता: कोलकाताच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरसोबत अत्याचार आणि हत्याप्रकरणात एक नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील सत्य लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय पीडितेच्या आई-वडिलांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे व्यक्त केला होता. यामध्ये कोण्या बड्या व्यक्तीचा हात असल्याचंही ते म्हणाले. आता सीपी विनीत गोयल यांनीही याचं गांभीर्य लक्षात घेता तपास सुरु केला आहे. तसेच, सर्व बाबींचा विचार केला जाईल, असे आश्वासन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिले.
या घटनेची चौकशी करण्यासाठी आरजीच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख आणि सहायक अधीक्षकांना मंगळवारी लालबाजार पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना ११ वाजेपर्यंत लालबाजार पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.



Social Plugin