सिद्धार्थ नगर येथील सामाजिक कार्यकर्ते गौतम सपकाळे यांचं दुःखद निधन

 





जळगाव शहरातील सिध्दार्थ नगर येथील  रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते गौतम रघुनाथ सपकाळे वय 45 यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. 

गौतम रघुनाथ सपकाळे हे सामाजिक कार्यात अग्रेसर होते. त्यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. गेल्या दोन तीन दिवसांपासून त्यांना अस्तव्यस्त वाटतं असंल्याने सपकाळे यांना काल रात्री मुंबई येथे उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेत असताना वाटेतच मालेगाव जवळ त्यांना सकाळी  3 वाजता पुन्हा हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.  गौतम सपकाळे यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलं मुली असा परिवार आहे. ते बंटी सपकाळे यांचे वडील आणि संध्या कन्ट्रक्शनचे संचालक सागर सपकाळे यांचे ते चुलत भाऊ होते. 

गौतम सपकाळे यांची अंत्ययात्रा आज  दुपारी 2 वाजता सिध्दार्थ नगर येथील राहत्या घरून निघेल व त्यांच्यावर मेहरून येथील स्मशान भूमी येथे अंतिम संस्कार केले जातील.