कानुबाई माता विसर्जन मिरवणुकीचे स्वागत.. खान्देश तेली समाज मंडळाचा अनोखा उपक्रम.







कुलस्वामिनी कानुबाई मातेचा उत्सव संपूर्ण खान्देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो . दरवर्षी श्रावण महिन्याच्या पहिल्या रविवारी कानुबाई मातेची स्थापना करून सोमवारी उत्साहात  विसर्जन करण्यात येते . शहरातील विविध समाजातील कुटुंबांच्या पारंपारिक  कानुबाई माता चा उत्सव साजरा करण्यात होतो. सालाबादप्रमाणे कानुबाई माता विसर्जन मिरवणुकांचे स्वागत खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने मिरवणुकीने येणाऱ्या प्रत्येक कानुबाई मातेचे स्वागत माजी महापौर कल्पना महाले, मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी, सचिव रवींद्र जयराम चौधरी , भारती चौधरी, भारती कैलास चौधरी, यांच्या हस्ते पूजन करून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.या मंडळाने नव्यानेच पाण्याच्या कारंजा लावली होती. पाण्याच्या कारंजामध्ये भाविक भक्तांनी आनंद घेतला.तसेच भाविभक्तांना चार टन केळीची  वेफर्स वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी मंडळाचे उपाध्यक्ष जयवंत चौधरी, सल्लागार विजय चौधरी, कार्याध्यक्ष मनोज चौधरी,शहर संघटक मुकेश चौधरी,यांचे योगदान लाभले .या कार्यक्रमाच्या  यशस्वीतेसाठी किरण बागुल, चंद्रकांत चौधरी, अमोल चौधरी, किशोर चौधरी, अतुल वाघ, अरुण चौधरी, शाम चौधरी, कमलेश चौधरी, आदीसह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.