पक्षाचा साधा कार्यकर्ता नगरसेवक, ते आमदार- राजुमामांचा राजकीय प्रवास.

 






पक्षाचा साधा कार्यकर्ता ते नगरसेवक,आणि आमदार अशी वाटचाल भाजपचे जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार सुरेश उर्फ राजुमामा भोळे यांची आहें. 

आपल्या मतदार संघातील   प्रश्नांबरोबरच जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्याचा वसा गेली दहा वर्षे जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार   असलेल्या सुरेश दामू भोळे उर्फ राजू मामा यांनी घेतला आहे. त्यांच्यातील समाजसेवी कार्यकर्ता महाविद्यालयीन जीवनापासूनच कार्यरत होता. आधीपासूनच सामाजिक कार्याची आवड होतीच सुरवातीला गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून ते कार्यकरीत होते. 

महाविद्यालयीन जीवनात समाजकारणाचे बाळकडू मिळाल्याने पुढील राजकीय जीवनात त्यांना समाजसेवेची सवयच लागली.पुढे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त म्हणून सामाजिक कार्य सुरू ठेवले. याच कामाच्या बळावर ते जळगाव नगरपालिकेचे नगरसेवक झाले, पुढे महापालिकेचे भाजपचे विरोधी पक्ष नेता झाले.शहराच्या विकासासाठी त्यांनी अविरत पणे काम सूरू ठेवले याचीच पावती म्हणून भाजपने त्यांना २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत जळगाव विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली. आणि लोकांनी त्यांना भरगोस मतांनी निवडून दिले.  जळगाव विधानसभेतून तब्बल नऊ वेळा निवडून आलेले दिग्गज आमदार सुरेशदादा जैन यांचा त्यांनी पराभव केल्याने राज्यात त्यांची जायंट किलर म्हणून ओळख झाली. सर्वसामान्य माणसाला सहज भेटणे हा त्यांचा महत्त्वाचा गुण असल्याने या संपर्कामुळे त्यांच्या आमदारकीचे कार्य दिसून आले. पुढे जळगाव महापालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला आणि त्यांच्या पत्नी सीमा ताई भोळे ह्या महापौर झाल्या. त्यानंतर २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने त्यांना जळगाव विधानसभा मतदार संघातून पुन्हा उमेदवारी दिली आणि आपल्या कार्याच्या बळावर ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून विजयी झाले.


जळगाव शहराच्या विकासासह त्यांनी विविध सांस्कृतिक, कला व क्रिडा उपक्रम हाती घेतले व तरूणांच्या ऊर्जेला सकारात्मक वाव दिला. तो वसा त्यांनी आजही जपला आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नुकताच 18 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या दरम्यान शहरातील विद्यार्थी महिला, तरुण यांच्यासाठी आमदार राजू मामा भोळे आयोजित आमदार सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. 


शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत पणे झटणारे राजू मामा भोळे येणाऱ्या 2024 विधानसभा निवडूकीत मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील अशी चर्चा जळगाव शहरात आहें.