अनुप अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मनोहर टॉकीज जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी मंत्री महाजन यांनी भगवा ध्वज उंचावत उपस्थितांना महायुतीच्या विजयासाठी साद घातली .अनुप अग्रवाल , अल्पाभाभी अग्रवाल यांचे औक्षण जयश्री अग्रवाल यांनी केले. यानंतर प्रत्यक्ष रॅलीला सुरुवात झाली.रॅलीत एका सजवलेल्या वाहनावर उमेदवार अनुपभैय्या यांच्यासह पालकमंत्री गिरीष महाजन, माजी मंत्री डॉ.सुभाष भामरे,माजी आ. राजवर्धन कदमबांडे, भाजपाचे प्रवासी प्रभारी आ.मुकेश पटेल,भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किरण शिंदे, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सुमित पवार, कुणाल पवार, लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीप साळवे ,आरपीआय शशिकांत वाघ,आदी उपस्थित होते.तसेच रॅलीत आरपीआय नेते महेंद्र निळे,विनायक शिंदे,तसेच भाजपाचे माजी महापौर जयश्रीताई आहिरराव , चंद्रकांत सोनार,प्रदीप कर्फे,माजी महापौर प्रतिभा चौधरी,महिला जिल्हाध्यक्षा वैशाली शिरसाठ ,तसेच सर्व नगरसेवक , नगरसेविका ,पदाधिकारी , भारतीय जनता पार्टी ,शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस,लोकजनशक्ती पार्टी,आरपीआय आठवले गट,महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि हजारो स्त्री,पुरुष ,तरुण कार्यकर्ते सहभागी झाले होते.
अनुपभैय्यांची ही मिरवणूक आग्रारोड मार्गे राष्ट्रपुरुषांना अभिवादन करीत अपर तहसील कार्यालयावर पोहचली .या ठिकाणी अपर तहसीलदारांकडे अग्रवाल यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
अनुप अग्रवाल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी धुळ्यात आलेले भाजपा नेते ना. गिरीष महाजन यांनी धुळे शहरासह पाचही मतदारसंघ महायुतीसाठी अनुकूल आहेत. असा विश्वास व्यक्त केला.ते म्हणाले की, धुळे शहरात १०० टक्के निकाल भाजपच्या बाजूने लागेल तसेच पाचही मतदारसंघात महायुतीच्या बाजूने जनता नक्की उभी राहील.लोकसभा निवडणुकीवेळी धुळे मतदारसंघातील पाचही विधानसभा क्षेत्रात भाजपलाच आघाडी मिळाली होती. फक्त मालेगावमध्ये काँग्रेस उमेदवाराला लिड मिळाला आणि आमचा निसटता पराभव झाला. मात्र आता विधानसभेत धुळे शहरासह पाचही मतदारसंघात भाजपा आणि महायुतीचे उमेदवार नक्कीच विजयी होतील.धुळे शहरातून अनुप अग्रवाल यांनी प्रचंड विजय मिळेल.

Social Plugin