काल वंचीत आघाडीची सहावी यादी जाहीर झाली असून, जळगाव शहर विधानसभा मतदार संघातून ललित रामकिशोर घोगले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यांचबरोबर मुक्ताईनगर मतदार संघातून संजय ब्राह्मणे यांना तर रावेर यावल मतदार संघातून शमीभा पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जळगाव शहर विधानसभेत भाजप कडून विद्यमान आमदार राजू मामा भोळे, उबाठा कडून जयश्री महाजन तर अपक्ष म्हणून भाजप चे माजी उपमहापौर डॉ अश्विन सोनवणे, तर उबाठा गटाचे माजी उप महापौर कुलभूषण पाटील या दिग्गजानी रणशिंग फुंकले असून वंचितने देखील उमेदवार दिल्याने आता जळगावात काटे की टक्कर अशी लढत बघायला मिळणार आहे.

Social Plugin