समाजवादी पार्टीचे इर्शाद जहागीरदार यांचा उमेदवारी अर्ज दाखल




समाजवादी पार्टीचे उमेदवार इर्शाद जहागीरदार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.या मतदार संघातून समाजवादी पार्टीचा आमदार म्हणून आपण नक्कीच निवडून येऊ आणि मुंबईत जाऊ.असा आत्मविश्वास यावेळी इर्शाद जहागीरदार यांनी व्यक्त केला.आपल्या मोजक्या समर्थक आणि समाजवादी पार्टीच्या  पदाधिकाऱ्यांसह हातात संविधानाची प्रतिकृती घेत पायी  येत इर्शाद जहागीरदार यांनी आज दुपारी नामांकन अर्ज दाखल केला .यावेळी कैलास चौधरी, नरेंद्र चौधरी,महेंद्र शिरसाठ, अमिन पटेल,जयाताई साळुंखे,गुड्डू काकर, आदी उपस्थित होते .या प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना इर्शाद जहागीरदार  यांनी सांगितले की समाजवादी पार्टीतर्फे आज आपण नामांकन दाखल केले. पक्षाचे अध्यक्ष  अखिलेश यादव व महाराष्ट्राचे अध्यक्ष  आ. अबू आझमी यांचे आपण आभार मानतो.त्यांनी आपणास  धुळे शहरवासीयांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. या मतदारसंघातून  समाजवादी पार्टीचा आमदार म्हणून आपण नक्कीच निवडून येऊ आणि मुंबईत जाऊ .असा आपणास आत्मविश्वास आणि खात्री आहे. आपण ईसीडी या त्रिसूत्रावर निवडणूक लढवीत आहोत. ईसीडी अर्थात रोजगार, भ्रष्टाचार मुक्त शहर आणि शैक्षणिक आणि सर्वांगीण विकास होय.या त्रिसूत्रावर ही निवडणूक लढविणार आहोत. विकासाची, व्हिजनची  भूमिका ठेवूनच लढवीत आहोत. धुळेकरांनी शहराचा कायापालट करणाऱ्या उमेदवाराला निवडून द्यावे. धर्माच्या नव्हे तर विकासाच्या मुद्द्यावर मते देऊन  धुळेकरांनी लोकप्रतिनिधी  निवडायला हवा.  अशी माहिती समाजवादी पार्टीचे उमेदवार इर्शादभाई जागीरदार यांनी दिली .