राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेचे मोहाडीत भव्य उद्घाटन.

 



महाराष्ट्र अँम्युचर नेटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने ,धुळे जिल्हाहौशी नेटबॉल असोसिएशन धुळे द्वारा, धुळे शहराच्या मोहाडी उपनगरातील श्री शिवाजी क्रीडा मंडळ आयोजित धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष कुणाल पवार व मोहाडीचे युवा नेते आकाश शिंदे यांच्या सौजन्याने १८ वी राज्यस्तरीय सबज्युनिअर ( १६ वर्षाआतील ) व ज्युनिअर  (१९ वर्षाआतील) मुले व मुलींच्या नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे धुळे शहराच्या मोहाडी उपनगरातील श्री . पिंपळादेवी विद्यालयात आज मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक विनायकबापू शिंदे, महाराष्ट्र अँम्युचर नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष विपीनभाई कामबार (नागपूर ) ,अखिल भारतीय नेटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष  तथा महाराष्ट्र अँम्युचर नेटबॉल असोसिएशनचे महासचिव डॉ ललित जीवानी (गोंदीया) ,सहसचिव शाम देशमुख ( भंडारा), धुळे जिल्हा क्रीडाधिकारी अविनाश टीळे, कबची  उमवि जळगाव क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील,अनिल संचेती ,कुणाल पवार,योगेश वाघ,मोहाडी नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक  मा.श्री जीवन बोरसे, अशोक तोटे, कैलास गर्दे ,,एस डी बाविस्कर, एस बि पाटील, व्ही बि ठाकरे , के आर सावंत, आर एस शिंदे,श्री पिंपळादेवी विद्यालयाचे प्राचार्या आर. व्ही.पाटील आदी उपस्थित होते.या स्पर्धेसाठी राज्यभरातून  एकूण ८३० खेळाडू मुले व मुली , संघ व्यवस्थापक ,प्रशिक्षक , पंच अधिकारी, आणि पदाधिकारी सहभागी झाले आहेत .