शहरातील अंजुमन- ए - इशाते तालीमद्वारा संचलित अँग्लो उर्दू हायस्कूल अँण्ड ज्यु . कॉलेज ऑफ सायन्स येथे झालेल्या विविध स्पर्धेत विजेते विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रम सैनिक भवन येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मालेगावचे आ. मुफ्ती इस्माईल कासमी , माजी उपमहापौर शव्वाल अन्सारी हे होते. व्यासपीठावर अंजुमन- ए- इशाते तालीमचे अध्यक्ष शकील अहमद, उपाध्यक्ष मुजफ्फर हुसैन, सचिव अकील अहमद , खजिनदार असलम सिराज अहमद, अँग्लो उर्दू हायस्कूल चेअरमन फैसल शाकील अहमद , संचालक अबरार रियाजुल हक, मुख्याध्यापक मुश्ताक अहमद,आरिफ खान, आदींसह उपस्थित होते.या स्पर्धेतील विजयी खेळाडूंना आ.मुफ्ती इस्माईल यांच्या हस्ते ट्रॉफी , मेडल,रोख रक्कम बक्षीस देण्यात आले. शारीरिक व मानसिक विकासासाठी खेळ किती महत्वाचे आहे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शकील अहमद शाहीन यांनी सांगितले.
आधुनिक काळात खेळात नाव व आर्थिक प्रगती यावर आ.मुफ्ती इस्माईल यांनी आपले मत मांडले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अब्दुल हफिज , हुमा शकील अहमद व तबस्सुम मॅडम यांनी केले.आभार सलीम अख्तर व नईम हमीद यांनी केले .तर शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केले आहे.


Social Plugin