शहरातील गल्ली नंबर ७ मधील चर्मकार भवन येथे संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या ६४८ व्या जयंतीनिमित्त स्व . तात्यासाहेब दिलीप उमराव जगताप प्रतिष्ठानातर्फे महाप्रसाद व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले.तसेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शेखर गवळी यांनी सुवर्ण पदक पटकवले तसेच सिल्वर मेडल प्राप्त पुरुषोत्तम विसपुते व दिल्ली येथे कराटे स्पर्धेत कृष्णा प्रजापत हिला सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील, ज्येष्ठ नेते बाबुराव नेरकर,समाजाचे अध्यक्ष जितेंद्र जगताप ,उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव भिवसन अहिरे, चर्मकार महासंघाचे उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राहुल जगताप , कार्याध्यक्ष पांडुरंग वानखेडकर, केतन जगताप ,दिनेश जगताप, राकेश जगताप,युवक अध्यक्ष राम कानडे, उपाध्यक्ष जगदीश सरोदे,आदित्य जगताप,हिरामण जगताप,महिला अध्यक्षा जयश्री वानखेडे,रामेश्वर चित्ते,भालचंद्र चत्रे, जितू पवार, श्याम कानडे,आदीसह समाज बांधव उपस्थित होते.


Social Plugin