खान्देश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय राज्यस्तरीय माळी समाज वधू-वर परिचय मेळावा राजश्री शाहू महाराज नाट्य मंदिरात संपन्न झाला.
खान्देश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय राज्यस्तरीय माळी समाज वधु वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन भाजपा प्रदेश चिटणीस डॉ. सुशील महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच वधू वर पुस्तिका प्रकाशन मुरलीधर राजाराम महाजन यांच्या हस्ते यावेळी माळी समाज वधु वर परिचय मेळाव्यात आलेल्या युवक युवतींनी आपला परिचय करून दिला. उपस्थित प्रमुख मान्यवर माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संतोष इंगळे, प्राचार्य डॉ.सुरेश नंदन , वसंतराव पाटील, हनुमंत वाडीले, हिलाल माळी,माळी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माळी , प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य बी. एच.जाधव,सुभाष जगताप,भारती माळी , विलासराव माळी, मधुकर माळी,गुलाब माळी,प्राचार्य बी. बी महाजन, शंकरराव खलाणे, मिलिंद सोनवणे,आर के माळी ,विजय महाजन,प्राचार्य एस.टी.चौधरी,कैलास माळी,कैलास पाटील, सुमित चौधरी, महेंद्र जगताप, परमेश्वर माळी , आसाराम माळी, राकेश बोरसे, प्रकाश महाजन,दीपक माळी,अशोक जाधव,गोरख माळी, यांच्यासह खान्देश माळी महासंघाचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .


Social Plugin