अमृतसर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मिलिंद सोनवणे यांनी केले आभिवादन.


रिपाई आठवले गटाचे जळगाव युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनवणे यांनी अमृतसर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. 



याबाबत सविस्तर माहिती अशी की काही दिवसांपूर्वी एका समाज कंटाकाकडून पंजाबच्या अमृतसर येथील सुवर्ण मंदिराकडे जाणाऱ्या हेरिटेज रस्त्यावर असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली होती.  या घटनेचा संपूर्ण भारतभर निषेध करण्यात आला होता. या स्मारकास भेट देण्यासाठी देशभरातून सामाजिक, राजकीय नेते, तसेच आंबेडकरी अनुयायी  भेट देत आहेत. त्या अनुषंगाने  जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व रिपाई आठवले गटाचे युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनवणे यांनी या ठिकाणी भेट देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासमवेत अमृतसर येथील स्थानिक अजीज शेख, व प्रकाश तायडे उपस्थित होते. 


मिलिंद सोनवणे हे दलित समजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध नेहमीच लढा उभारून, आंदोलने, मोर्चे काढून शासनाचे लक्ष वेधत असतात त्यांच्या या कार्याला पोलीस चौफेर न्यूजचा सलाम.