ऊशु मध्ये सुवर्णपदक घेऊन मनस्वीची उत्तुंग भरारी

 




दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी ऑल महाराष्ट्र ऊशु असोसिएशन पुणे द्वारा आयोजित खेलो इंडिया अस्मिता राज्यस्तरीय निवड चाचणी भिवंडी, मुंबई येथे   ऊशु खेळाची राज्यस्तरीय निवड चाचणी घेण्यात आली होती यात जळगाव जिल्ह्यात सह महाराष्ट्रभरातून खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता यात  जळगाव जिल्हा पोलीस स्पोर्ट्स अकॅडमीची खेळाडू कुमारी मनस्वी संदीप तायडे हिने सांशू या प्रकारात - 56 किलो आतील वजन गटात सुवर्णपदक मिळविले मनस्वी ही पोलीस स्पोर्ट्स अकॅडमी ची खेळाडू असून जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलिस अधिकारी जळगाव भाग संदीप गावित ,राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवाल ,सहाय्यक पोलिस निरीक्षक वेल्फेअर योगिता नारखेडे  ,रावसाहेब गायकवाड,पप्पू देसले यांनी पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या तसेच खेळाडूना कराटे प्रशिक्षक अश्विनी निकम/जंजाळे, जागृती काळे/महाजन,राजेंद्र जंजाळे सर  यांचे मार्गदर्शन लाभले.