धुळे जिल्ह्यातील व शहरातील डीजेचा कर्कश आवाजाचे प्रेशर मिड बंद करा - सागर मोहीते यांची पोलीस प्रशासनाकडे मागणी.



धुळे जिल्ह्यातील डीजेचा आवाज खूपच कर्कश होत आहे. त्या.मागचे कारण म्हणजे प्रेशर मिड स्पीकर होय.या प्रेशर मीड स्पीकरमुळे जनतेला कर्णदोष  होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी गणपती उत्सवात  जास्त प्रमाणात पोलिसांना व लोकांवर कर्ण दोष होऊन ऐकू येण्याचे प्रोब्लेम आले असून त्यामुळे डीजे साऊंड मधील नवीन स्पीकर आला आहे. तो म्हणजे प्रेशर मिड हा एकाही डीजे मध्ये वाजू नये.ही दक्षता घेऊन आपण डीजे चालक ,मालक यांची मिटिंग घेऊन प्रेशर मीड बंद बाबत कारवाई करावी व यापुढे ज्या - ज्या डीजे मध्ये प्रेशर मीड आढळून आल्यास त्या डीजे वर कारवाई करावी .या कर्णकर्कश  आवाजावर व आवाजामुळे होणाऱ्या स्पर्धेवर वेळीच आवर घालणे आवश्यक आहे. तसेच आरोग्यासह सामाजिक स्वास्थ्य बिघडविणाऱ्या डीजेला आवाजासाठी शासनाने नियम केले आहेत.विवाहसह इतर सभारंभासाठी डीजेच्या अमर्याद आवाजाने नागरिकांच्या कानठळ्या बसत आहेत. कर्कश आवाजावर आपण आळा घालावा. प्रेशर मिड बंदी करावी,या स्पीकरमुळे वरील त्रास होत आहे.वरील सर्व प्रकारांमुळे डिजेवर बंदी येऊ शकते.आणि लहान साऊंड व डीजे व्यवसायावर याचा परिणाम  होऊन उपासमारीची वेळ येऊ शकते म्हणून मी एक डीजे साऊंड व्यावसायिक असून मी व्यवसाय वाचविण्यासाठी प्रयत्न करतो आहे.तरी आपण वरील सर्व बाबींवर आळा घालून आवाजाची मर्यादा संदर्भात मिटिंग घेऊन प्रेशर मीड व मोठ्या कर्कश आवाजावर मर्यादा घालून डीजे धारकांना सूचित करावे .अन्यथा ऑल इंडिया पँथर सेनेतर्फे तीव्र आंदोलन करणार यांची  नोंद घ्यावी.यावेळी सागर मोहिते,नागसेन बागुल,अनिताताई सोनवणे,विशाल वाघ,आनंद अमृतसागर,प्रशांत थोरात,आकाश घोडे,योगेश बैसाणे,प्रवीण शिंदे,पूजा चव्हाण, निलेश इंदवे,संघरत्न गायकवाड, सुमित अहिरे,सिद्धार्थ वेंदे, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.