धुळे वकील संघाचा बांधकाम विभागाला घेराव ; लिफ्ट दुरुस्ती व नवीन लिफ्ट बसविण्याचे आश्वासन.




धुळे जिल्हा न्यायालयाच्या नव्या इमारतीतील लिफ्ट गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याच्या पार्श्वभूमीवर आज धुळे जिल्हा वकील संघाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता घेराव आंदोलन करण्यात आले. मोठ्या संख्येने वकिलांनी वकिली पोशाखात उपस्थित राहून शांततामय मार्गाने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे समस्या मांडल्या.

या वेळी वकील संघाच्या अध्यक्ष अँड.राहुल पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर करत लिफ्टबाबतचा  सविस्तर आढावा मांडला.त्यांनी सांगितले की न्यायालयाच्या लिफ्ट्स सतत बंद राहत असून त्यांची झळ सर्वसामान्य  नागरिक , महिला, ज्येष्ठ नागरिक व वकिलांना बसत आहे.याबाबत वेळोवेळी लेखी निवेदन सादर केली असतानाही बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे.आता आमच्याकडे शांत बसण्याचा पर्याय नाही. अखेर वकील संघाच्या ठाम भूमिकेमुळे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर लिफ्ट दुरस्त करण्याचे तसेच नवीन आधुनिक लिफ्ट बसविण्याच्या प्रकियेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील.असे लेखी आश्वासन दिले. लवकरच या समस्येवर ठोस उपाय योजले जातील.अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.या आंदोलनात वकील संघाचे ज्येष्ठ सदस्य ॲड .रवीदादा देसर्डा , ॲड. बी. डी.पाटील, ॲड जितेंद्र निळे, ॲड.राजू गुजर, सचिव बळीराम वाघ, ॲड. उमेशकांत पाटील,महिला उपाध्यक्षा ॲड.भावना पिसोळकर, महिला सचिव ॲड .सुधा जैन, उपाध्यक्ष ॲड.भिसे, ॲड.राहुल भामरे, ॲड.अभिजीत पाटील, ॲड. हितेश कबाडे, ॲड. जुगनू  गायकवाड, ॲड.जगदीश सूर्यवंशी, ॲड. विनोद सोनवणे,कार्यकारणी सदस्य ॲड.उमाकांत घोडराज, ॲड.अर्जुन महाले, ॲड. तरुणा पाटील, ॲड. शिवप्रिया पाटील आदी वकिलांनी सहभाग नोंदवला.