शिरसोली भोलेनाथ नगर येथील रस्त्यांची बिकट अवस्था कामे होत नसल्याने नागरिकांना सहन करावा लागतो आहे नाहक त्रास.

 



शिरसोली प्र.न येथील जळके रोडवरील भोलेनाथ नगर या भागात रस्त्यांची कामे होत नसल्याने येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे यासादर्भात वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांकडून संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. 

याबाबत थोडक्यात माहिती अशी की, 

पावसाळा सुरू झाल्यानंतर नेहमीप्रमाणे शिरसोली प्र.न येथील जळके रोडवरील भोलेनाथ नगर येथील भागात रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शिरसोली ग्रामपंचायतीने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. वारंवार यासंदर्भात मांगणी करूनही रस्त्यांची कामे होत नसल्याने पत्रकार जितेंद्र शिरसाठ यांनी खंत व्यक्त केली आहे.