बँकिंग, विमा, पोस्टल, खाणकाम, बांधकाम आणि अशाच इतर अनेक क्षेत्रातील जवळपास देशातील 25 कोटी कामगार आज होणार्या ‘भारत बंद’मध्ये सहभागी होणार आहेत. देशातील दहा प्रमुख कामगार संघटनांनी एका दिवसाच्या 'भारत बंद'ची हाक दिली आहे. या बंदला धुळ्यात ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन या बंदमध्ये सहभागी झाला आहे...
केंद्र सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि देशविरोधी कॉर्पोरेट-केंद्रित धोरणांना विरोध करण्यासाठी संपूर्ण देशभर हे आंदोलन केले जात आहे. विशेष म्हणजे, केवळ उद्योगपतींच्या फायद्यासाठी धोरणे आखली जात असून त्यामुळे कामगार, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे.या आंदोलनात वर्किंग कमिटीचे अध्यक्ष कॉ.आर. व्ही. खैरनार,सचिव कॉ. एम.डी.अहिरे, अध्यक्ष कॉ बी. एम. भामरे, सचिव कॉ एस.आर.पाटील , दीपक पाटील,राजेश नेरकर, दीपक सैंदाणे,दिनेश साळुंखे, के. एस.गवळी , कृष्णा वाघ,प्रभाकर मोरे, नाना न्हावी,बी. बी पालवे, आदी उपस्थित होते.

Social Plugin