माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलन.



शासनाच्या विविध निर्णयामुळे महाराष्ट्रातील मराठी शाळा व सर्व माध्यमाच्या अनुदानित शाळा अडचणीत आल्या आहेत असून काही शाळा बंद पडल्या आहेत. तर बहुतांश शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. यासह इतर विविध समस्यांची जाणीव शासनाला होण्यासाठी आज क्यूमाईन क्लब येथे  माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. प्रमुख मागण्या दि.१५ मार्च २०२४ च्या संचमान्यता  संदर्भातील शासन निर्णय रद्द करून मागील २८ ऑगस्ट २०१५ च्या शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही व्हावी , राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी पदभरतीबाबत दि. २८ मे  २०२५ रोजी शिक्षण संचालक  यांनी काढलेले पत्र रद्द करून पदभरतीस  मान्यता देण्यात यावे.शिक्षण भरती पवित्र पोर्टलद्वारे वर्षातून दोनदा केली जावी. दि.१ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित, अशर्त : अनुदानित नियुक्त शिक्षक , शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. दि.१४ ऑक्टोबर २०२४ शासन निर्णयानुसार घोषित केल्याप्रमाणे टप्पा वाढ त्वरित देण्यात यावी , वेतनेतर अनुदान सातव्या वेतन आयोगाच्या वेतनावर मिळावे यासह इतर मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी  संघाचे  अध्यक्ष आर.व्ही.पाटील, सचिव  यु. डी . तोरवणे, बी. के .नांद्रे , एस.बी . सूर्यवंशी , विजय बोरसे, डी. के.पवार,उपाध्यक्ष के. व्ही. बाविस्कर , सतिष देवरे, डी. ए . चौधरी, पी.आर साळुंखे,जगदीश शिंदे, ज्ञानेश्वर वाघ, प्रकाश सोनवणे, आर.जे.पाटील ,किरण जाधव, एस. एस .भालकर,आदीसह  पदाधिकारी व मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते.