“बरडे आप्पा” यांचा वार्ड क्र. 12 म्हणजेच – विकास आणि सामाजिक योगदानाची ओळख.


जळगाव – जळगाव प्रभाग क्र. 12 चे माजी नगरसेवक नितीन “बरडे आप्पा” बरडे यांनी आपल्या वार्डातील नागरिकांसाठी सातत्याने केलेल्या विकास कामांमुळे प्रभागात सकारात्मक बदल घडवले आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, सार्वजनिक सुविधा तसेच शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे वार्डातील नागरिकांचा विश्वास त्यांच्यावर दृढ राहिला आहे.


आप्पा यांनी गेल्या १५ वर्षांपासून नगरसेवक म्हणून सेवा बजावत प्रभागाचा समग्र विकास साधला आहे. महापालिकेत पाणीपुरवठा सभापती म्हणून कार्य करत अनेक पाणीपुरवठा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत.


शिक्षण क्षेत्रातही आप्पा यांनी आपली जबाबदारी उचलली आहे. श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कुल चे संचालक म्हणून, दरवर्षी शालेय साहित्य वाटप करून खेडाळू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जाते. शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, सहाय्य आणि आवश्यक साहित्य पुरवणे, हे आप्पा आणि त्यांच्या कुटुंबाच्या सामाजिक योगदानाचे उत्तम उदाहरण आहे.


वार्डातील नागरिकांनी आप्पा यांच्या सातत्यपूर्ण सेवाकार्यातून प्रेरणा घेत, येणाऱ्या निवडणुकीत त्यांना आणखी जास्त मतांनी निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. आप्पा यांच्या नेतृत्वाखाली प्रभागात शिक्षण, विकास आणि नागरिकांच्या सुविधेत अधिक गती येईल, असा नागरिकांचा विश्वास आहे.


नितीन “बरडे आप्पा” यांचे नेतृत्व केवळ विकासकामापुरते मर्यादित नाही, तर सामाजिक बांधिलकी, विद्यार्थ्यांसाठी दिलेला वेळ, मार्गदर्शन आणि सहकार्य यामुळे ते संपूर्ण प्रभागासाठी आदर्श नेता ठरले आहेत.


आज नितीन “बरडे आप्पा” यांचा वाढदिवस आहे!

त्यांना त्यांच्या सेवाभावी वृत्ती, नेतृत्व आणि सामाजिक योगदानासाठी हार्दिक शुभेच्छा! 🎉🎂