भारतीय जनता पार्टीच्या जळगाव पश्चिम जिल्हा अनु, जाती. मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी युवराज उर्फ संभा आप्पा जाधव यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ६ सप्टेंबर २०२५ रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे जळगाव पश्चिम जिल्हा मोर्चाच्या नूतन जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहे. यात अनु. जाती. मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी युवराज उर्फ संभाआप्पा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संभा आप्पा जाधव हे नेहमीच दलित समाज्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात बंड पुकारून शासनदरबारी मोर्चे आंदोलन करीत असतात. त्यांच्या याच कामाची दखल भारतीय जनता पार्टीने घेत त्यांना ही जबाबदारी सोपविली आहे. सदरची नियुक्ती, मुख्यमंत्री. देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या आदेशाने, मा.ना.गिरीश महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी विभागीय संघटन मंत्री रवि अनासपुरे यांच्या मान्यतेनुसार,खा. स्मिताताई वाघ, आ.मंगेशदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी यांनी केली आहे.
दरम्यान संभा आप्पा जाधव यांच्यावर सर्व स्तरातून, तसेच भाजप पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Social Plugin