बंजारा समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी धुळ्यात बंजारा आरक्षण समितीच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात येणार आला.त्यावेळी धुळे शहरातील छत्रपती अग्रेसेन महाराज यांच्या चौकातून मोर्चाला सुरुवात झाली.धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने बंजारा बांधव सहभागी झाले होते. हैदराबाद गॅजेट प्रमाणे बंजारा समाजालाही आरक्षण देण्यात यावे. बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा . तसेच सीपी बिरार गॅझेट बंजारा समाजाला लागू करावा यासह विविध मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या आहेत. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देत हजारोंच्या संख्येने बंजारा समाजाचा मोर्चा धडकला. यावेळी बंजारा आरक्षण कृती समितीच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सेवालाल महाराज आरक्षण आमच्या हक्काचं , बंजारा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे.अशा घोषणा देत मोर्चा जेलरोडवर दाखल झाला.या ठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनास निवेदन सादर केले. शहरातील मालेगाव रोडवरील अग्रसेन महाराज पुतळ्यापासून मोर्चास सुरुवात झाली. या मोर्चासाठी जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून समाजबांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चेकरांनी विविध मागण्यांचे फलक हाती घेतले होते. घोषणाबाजी करीत हा मोर्चा आग्रा रोडमार्गे जेल रोडवरील दाखल झाला.या ठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.यावेळी समाजातील नेत्यांनी समाजाच्या विविध मागण्या, अडीअडचणी मांडल्या, हैदराबाद गॅजेट प्रमाणे समाजास आरक्षण मिळावे, सी.पी बेरार गॅजेट लागू करावे,लोकूर समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, अशा आपल्या प्रमुख मागण्या असून समाजाची एकीच आपली ताकद आहे. शासनदरबारी आपली मागणी ठामपणे मांडल्यास न्याय नक्कीच मिळेल असे सांगितले त्यानंतर समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. या मोर्चाचे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.या विराट मोर्चात समितीचे अध्यक्ष अँड सुधीर जाधव , समितीचे सदस्य प्रा जवाहर पवार, अनिल पवार, डॉ.साईदास चव्हाण, अँड.राहुल जाधव,नवल पवार,कैलास जाधव, दिनेश जाधव, विजय जाधव,योगेश राठोड, डॉ.योगेश जाधव,हर्षल पवार,भास्कर जाधव आदींसह समाज बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

Social Plugin