शिरपूर - जळोद आश्रम शाळेच्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करण्याचे निवेदन देत धरणे आंदोलन.


शिरपूर तालुक्यातील जळोद  येथील शाळेबाबत  आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या नियंत्रणात अनुदानीत आश्रम शाळा आहे. खान्देश कन्या स्मिता पाटील शिक्षण सेवा सोसायटीतर्फे ही शाळा चालविली जाते.या संस्थेच्या तत्कालीन संचालक मंडळाने १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२४ या काळातील इमारत या काळातील इमारत भाड्याची २ कोटी  १७ लाख ५६ हजारापेक्षा जास्तीची रक्कम तत्कालीन अध्यक्ष सुभाषसिंह जमादार यांची बनावट स्वाक्षरी करून काढून घेण्यात आली आहे.अशी तक्रार करण्यात आली आहे. तसेच बनावट स्वाक्षरी करून शाळा स्थलांतरित  देखील केली आहे.याबाबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या प्रकल्प  अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती.या प्रकरणी अशोक  आधार पाटील श्रीमती योगिता पाटील यांच्यावर कारवाई  करण्याबाबत तक्रार करण्यात आली होती .त्यानुसार सरपंच सीमा लक्ष्मण भील यांना प्रकल्प  कार्यालयाने संबंधितांच्या विरोधात ६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले होते. पण प्रकल्प कार्यालयाने याबाबत काहीच कार्यवाही केली नाही म्हणून काहींनी आज प्रकल्प कार्यालयावर निदर्शन करीत धरणे आंदोलन केले.यासंदर्भात आज पुन्हा प्रकल्प कार्यालयासह   जिल्हा पोलीस प्रमुख आणि आझादनगर पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले. गैरव्यवहारा बाबत अशोक आधार पाटील आणि इतरांबाबत कारवाई  करण्याकडे हेतूत दुर्लक्ष केले जात आहे.कदाचित या गैरव्यवहारात प्रकल्प अधिकारी  कार्यालयातील काही कर्मचारी सहभागी असावेत , अशी शंकाही  उपस्थित करण्यात आली आहे. त्यामुळे आता व्यापक चौकशी करण्यात यावी आणि या गैरव्यवहारात दोषी आढळणाऱ्या प्रकल्प कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या विरोधात देखील पोलिसात गुन्हा करण्यात यावा.अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनावर कैलाससिंग राजपूत,हंसराज चौधरी ,जयेश बागुल, यांच्यासह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.