शिवरक्षक जिवाजी महाले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी



 अखिल भारतीय जिवा सेना व सकल नाभिक समाज धुळे यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू अंगरक्षक शिवरत्न जिवाजी महाले यांची 390 वी जयंती दि.9 ऑक्टोबर 2025 रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.‌ शिवरक्षक जिवाजी महाले यांनी प्रतापगडावरील अफजल खान भेटीप्रसंगी सय्यद बंडाचा हात कलम करून छत्रपती शिवरायांचे प्राण वाचविले होते. जिवाजींच्या या पराक्रमाबद्दल छत्रपती शिवरायांनी होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी या गौरवद्गाराने जिवाजींचा सन्मान केला. त्यामुळे हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात शिवरक्षक जिवाजी महाले अजरामर झाले. शिवरक्षक जिवाजी महाले जयंती निमित्ताने धुळे शहरात भव्य दिव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आग्रा रोड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पन करून शिवरक्षक जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे व रथाचे पूजन समाज पदाधिकाऱ्यांचे हस्ते करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. रॅलीत सहभागी प्रत्येक मोटरसायकल स्वार बंधूंना भगवी पट्टी, भगवी टोपी तसेच गाड्यांना भगवे झेंडे लावण्यात आले होते. अखिल भारतीय जिवा सेनेच्या महिला पदाधिकारींनी भगव्या रंगाच्या साड्या परिधान करून सर्वांना फेटे बांधण्यात आले होते. अतिशय भगव्या वातावरणात सदर रॅली आग्रारोड, गांधी पुतळा व तेथून दत्तमंदिर चौक मार्गाने शिवरक्षक जिवाजी महाले फलकापाशी आली. तेथे फलकाला माल्यार्पन करण्यात आले. चौकाचौकात फटाक्यांची आतिषबाजी करीत बँडच्या तालावर तरुण व महिलांनी जल्लोषात जय शिवाजी, जय जिवाजी, संत सेना महाराज की जय, नाभिक समाजाचा विजय असो अशा घोषणा देत अत्यंत जल्लोषात रॅली संत सेना महाराज मंगल कार्यालय देवपुर, धुळे येथे आली. शिवरक्षक जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन धुळे शहराचे आमदार मा. अनुप अग्रवाल व प्रमुख मान्यवरांच्या यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विचार पिठावर अखिल भारतीय जीवा सेनेचे प्रदेशाध्यक्ष दिनेश महाले, उपाध्यक्ष भगवान चित्ते, संघटक सुधीर महाले, शहराध्यक्ष राहुल सूर्यवंशी, माजी नगरसेवक उमेश महाले, चौगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच दासभाऊ महाले, युवक प्रदेशाध्यक्ष देविदास फुलपगारे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष गणेश ठाकरे यांचेसह धुळे जिल्हा नाभिक हितवर्धक संस्थेच्या जिल्हाध्यक्ष  सौ. त्रिवेणीताई सोनवणे, जिवा सेना धुळे जिल्हाध्यक्ष सौ. मनिषा चित्ते, शहराध्यक्ष वैशाली सैंदाणे, सौ. रजनीताई सूर्यवंशी, छाया महाले, ज्योती महाले,भावना सोनवणे, कल्याणी ठाकरे,मीना बोरसे, बापू सैंदाणे,आदी उपस्थित होते. मा. अनुप अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर शिवरक्षक जिवाजी महाले यांच्या शौर्याबद्दल धाराशिव येथील व्याख्याते श्री. रवींद्र अशोक राऊत यांचे व्याख्यान झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेशाध्यक्ष दिनेश महाले यांनी केले तर सूत्रसंचालन सौ. त्रिवेणीताई सोनवणे व गणेश ठाकरे यांनी केले. या ठिकाणी सर्व उपस्थित समाज बंधू-भगिनींसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. 

     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, सर्व देणगीदार, राहुल सूर्यवंशी, अविनाश अहिरराव, बबलू वसाने,संजय अहिरराव,वसंत चित्ते,भोला सैंदाणे,मनोज ठाकरे, मनोज सैंदाणे, सतिष पवार,किशोर वाघ,संदीप निकम, गोपाल चित्ते,मनोज अहिरराव, अनिल वाघ, विठ्ठल बोरसे, खेमचंद ठाकरे,नितीन महाले,महेश सैंदाणे, गिरीष महाले, भैया महाले, नंदू सोनवणे, प्रशांत बागुल,अरुण सूर्यवंशी, योगेश सैंदाणे, भिकन सैंदाणे,शशी सैंदाणे, तुकाराम महाले, किशोर खोंडे, विशाल बोरसे, भैया ठाकरे,नाना वारुडे, पप्पू ठाकरे, अमृत महाले किशोर सोनवने, ईश्वर सैंदाणे, पंकज ठाकरे, भैया वारुडे, नंदू बोरसे, गजानन भदाणे, राहुल खोंडे, कैलास कासार, सचिन शेवतकर, संदीप भदाणे, भाया पगारे, मंथन वाघ,कृष्णा महाले,प्रमेश चित्ते,आदीनी सहकार्य केले.