यंदा राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानीचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. सरसकट कर्जमाफीही द्यावी अशी मागणी पुरोगामी विचार मंचच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की चालू वर्षी महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली नगदी व धान्य भरड धान्य पिके तसेच कपाशी व फळबागा नेस्तनाबुत झाले आहे.यामुळे जनतेचा अन्नदाता उपासमारी, कर्जबाजारी, झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या मनोबल खचले आणि त्यांनी आत्महत्या करू अशी निराशाजनक भावना बोलून दाखवली आहे.
सरकारने वेळीच नुकसान भरपाई व कर्जमाफी न केल्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या चौपट वाढतील .संपूर्ण जनतेचे जीवन शेतकऱ्यांवरच अवलंबून असून कितीही पैसे असले , तरी त्यांचे पोट शेतकऱ्यांनी पिकवलेल्या खाद्यावरच अवलंबून राहावे लागते. श्रीमंत अदानी आणि अंबानी हे देखील अन्नच खातात. नोटा खाऊन कुणीच जगत नाहीत.अशा संतप्त भावना निवेदनातून व्यक्त करण्यात आल्या आहेत
अलीकडे निसर्गाचा कोप आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात सरकारची उदासीनता या भायावह परिस्थितीमुळे अखेर अनेक शेतकरी आत्महत्येच्या मानसिकतेत पोहचत आहे.परिस्थती ठाऊक असतानाही शेतकऱ्यांना मदत न करणे म्हणजे एकप्रकारे सरकारने शेतकऱ्याची केलेली हत्याच होय.दुसरीकडे मात्र मतांसाठी फालतू खर्चाच्या योजना राबविण्यात येत आहे.त्या बंद केल्यातर आवश्यक घटकासाठी आर्थिक निधीची कमतरता भासणार नाही. यापार्श्वभूमीवर भविष्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी व कुठलेही निकष न ठेवता सरसकट कर्ज माफी द्यावी अशा मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे.याप्रसंगी हरिश्चंद्र अण्णा लोंढे,प्राध्यापक बाबा हातेकर,ज्येष्ठ पत्रकार हेमंत मदाने,पंडित गोसावी,प्रभाकर खंडारे,पंडित गोसावी, रमेश दाणे,बबन वानखेडे,मनोहर मोहिते,हर्षबोध मोरे, बी . टी अहिरे, एल.आर. राव , महिंद्र महाले,अशोक शिरसाठ, कॉम्रेड पोपटराव चौधरी,धनंजय गाळणकर, दीपकुमार साळवे, राजेंद्र धोढरे, श्रीकृष्ण बेडसे आदी उपस्थित होते.

Social Plugin