धुळे तालुका दुष्काळी घोषित करून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे सरसकट पंचनामे करू नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी करीत रावेर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. दिपाली साहेबराव देवरे यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हाधिकारींना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, या वर्षी सन २०२५ च्या पावसाळ्याच्या शेवटी शेवटी, ऐन खरिपाची पिके शेतकऱ्यांच्या हातात येण्यापूर्वीच कालावधीतच सर्वत्र मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. त्यात धुळे तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन, निसर्गाच्या प्रकोपामुळे तालुक्यातील कापूस पिकांची मोठी हानी झालेली आहे. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने शेतकऱ्यांपासून हिरावून घेतलेला आहे. कापूस पूर्णपणे लाल पडून झाडावरच सोडून गेलेला आहे. .मका, ज्वारी, बाजरी, कांदे, भाजीपाला, फळबाग , कडधान्य यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या असून, शेतकरी हवालदिल झालेला आहे. पुढील आयुष्य कसे जगावे ही मोठी चिंता त्यांना लागून राहिलेली आहे.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो रात्र पहात नाही, दिवस पाहात नाही, ऊन पाहात नाही, थंडी पहात नाही, मात्र आपल्या शेतात राबत असतो.आणि त्यातून आपला उदरनिर्वाह करीत असतो. मात्र या वर्षी त्यांच्यावर अतिवृष्टी होवून अस्मानी संकट कोसळले आहे. जवळच येणाऱ्या दिवाळीसारखा सण देखील साजरा करण्यात करणे आता त्यांच्या आवक्याबाहेरचे झालेले आहे.
म्हणून रावेर ग्रामस्थांतर्फे आपणास विनंती आपला धुळे तालुका आता दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित व्हावा.त्यासाठी आवश्यक ती तजवीज करण्याचे आदेश सर्वसंबंधितांना द्यावेत. मा राज्य शासनाकडेस प्रस्ताव सादर करा करावा , अशी मागणी निवेदनातून लोकनियुक्त सरपंच सौ.दिपाली साहेबराव देवरे , ग्रा. प.सदस्य खटाबाई अण्णा पवार, ग्रा. प. सदस्य राणी दादाभाऊ खैरनार, ग्रा. प.सदस्य मनीष नंदूलाल देवरे, यांनी आज जिल्हाधिकारी धुळे येथे आपली भेट घेवून ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने निवेदन सादर केली.

Social Plugin