कोल्हे हिल्स वाघ नगरातील युवकांचा वंचित आघाडीत प्रवेश

 




जळगाव – आज दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी शहरातील कोल्हे हिल्स, सावखेडा शिवारातील वाघ नगर येथील उत्साही युवकांनी वंचित बहुजन युवा आघाडीत प्रवेश केला. जिल्हा अध्यक्ष ईश्वर पाटील (लाला सर), युवा जिल्हा अध्यक्ष जितू केदार आणि महानगर अध्यक्ष मनोज अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.


या प्रसंगी युवा उपाध्यक्ष दिगंबर सोनवणे, उपाध्यक्ष प्रवीण इंगळे, सोनू गाडे, शोएब पटेल, अभिषेक भालेराव, शीलवान चव्हाण, शक्ती सोनवणे, राकेश बनसोडे, मनीष लोखंडे आणि मंगल कोळी, दहीभत्ते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि सामाजिक न्यायाच्या विचारांनी प्रेरित होऊन या युवकांनी वंचित बहुजन युवा आघाडीत प्रवेश करून पक्षाची ताकद अधिक मजबूत केली आहे.