जळगाव – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) मध्ये संघटन बळकटीसाठी हालचालींना वेग आला आहे. जळगाव शहराच युवा नेतृत्व रिपाई आठवले गटाचे युवक जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनवणे यांनी पदाधिकाऱ्यांसह समाजरक्षक राजू सूर्यवंशी यांची भेट घेऊन आगामी निवडणुकीच्या संदर्भात तसेच 3 नोव्हेंबर रोजी महाड येथे होणाऱ्या रिपाईच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त तयारीबाबत सविस्तर चर्चा केली.
या चर्चेदरम्यान जिल्हास्तरीय बैठक लवकरच आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत संघटनात्मक बांधणी, युवा कार्यकर्त्यांची भूमिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांतील पक्षाची रणनीती यावर चर्चा होणार आहे.
यावेळी आरपीआय चे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांचा शाल व फुलहार घालून सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी रिपाईचे पदाधिकारी किरण आडकमोल, पंकज सोनवणे, राजू साळुंखे, इमरान बागवान, प्रवीण वाघ, अविनाश नन्नवरे, गोलू सोनवणे, अविनाश पारधे, सतीश सोनवणे आदी उपस्थित होते.
दरम्यान 3 नोव्हेंबर रोजी महाड येथे होणाऱ्या रिपाईच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आव्हाहन रिपाई जळगाव जिल्हा युनिटच्या माध्यमातून करण्यात आले आहे.


Social Plugin