धुळे तालुक्यातील श्री.गुरुदत्त विद्याप्रसारक संस्था संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय कुरखळी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक व्ही. टी.पाटील यांना कामकाजातील अनियमिततेमुळे संस्थेतून बडतर्फ करण्यात आले होते.माजी मुख्याध्यापक व्ही. टी पाटलांनी याप्रकरणी शाळा न्यायाधीकरण नाशिक येथे धाव घेवून खोटी कागदपत्र सादर केली.त्यानुसार शाळा न्यायाधिकरणने संस्थेसह शिक्षणाधिकाऱ्यांना दोषी धरून शिक्षणाधिकाऱ्यांची खुर्ची जप्तीचे आदेश दिले.त्यानुसार उपशिक्षणाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्यात आली.शाळा न्यायाधिकरणने दिलेला निर्णय अमान्य असल्याने मा.उच्च न्यायालय छत्रपती संभाजी नगर खंडपीठ येथे याचिका दाखल करणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष युवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेप्रसंगी श्री.गुरुदत्त विद्याप्रसारक संस्थेच्या अध्यक्षांसह सचिव अनिल युवराज सनेर,मुख्याध्यापक दीपक विनायक भट, उपशिक्षिका माधुरी सुभाष देवरे उपस्थित होते.यावेळी माहिती देताना पाटील पुढे म्हणाले की, सेवानिवृत्त मुख्याध्यापक व्ही. टी पाटील यांना बडतर्फे केल्यानंतर दुसऱ्यांदा संधी म्हणून संस्थेने पदावनत करत उपशिक्षक पदावर पुन्हा रुजू करून घेण्यात आले. मुख्याध्यापक पदावर असताना अनेक गैरप्रकार केले.नोटीस देवूनही बैठकींना गैरहजर राहणे यांसारखे अनेक प्रकार करत शाळेचे सर्विस बुक स्वतःजवळ ठेवून घेतले. पेन्शनपोटी बारा लाख व पीएफ पोटी पाच लाखांचा रक्कम संस्थेकडून देण्यात आली असतांना आणखी रक्कम मिळण्यासाठी शाळा न्यायाधिकरण नाशिक येथे संस्थेविरोधात धाव घेतली .शाळा न्यायाधिकरणात दहा वर्ष कामकाज चालले या कालावधीत व्ही. टी .पाटील सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्ती नंतर संस्था रुजू करणे अशक्य होते.त्यानंतर मुख्याध्यापकाच्या जागेवर अद्याप भरती करण्यात आलेली नाही.शाळा न्यायाधिकरण नाशिकने माजी मुख्याध्यापक व्ही. टी . पाटलांना फरकाची रक्कम संस्थेस अदा करणे , त्यांच्या पेन्शनचा प्रस्ताव सादर करून पेन्शनचा लाभ देण्याबाबत निकाल दिला. न्यायाधिकरणचा निकाल संस्थेला मान्य नसल्याने मा.उच्च न्यायालय मा.उच्च न्यायालय , संभाजी नगर खंडपीठ येथे याचिका क्र .४८६८/२०२४ निकालाच्या विरोधात याचिका दाखल केली असल्याचे यावेळी सांगितले.

Social Plugin