जळगाव प्रतिनिधी — शहरातील प्रभाग क्र. 12 मध्ये सध्या नागरिकांमध्ये एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे इंजि. नितीश कैलास कापडणे.
व्यवसायाने अभियंता असलेले नितीश कापडणे हे सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. समाजातील विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग आणि सर्वसामान्य नागरिकांशी असलेला दांडगा संपर्क यामुळे त्यांनी प्रभागातील तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, “प्रामाणिक, शिक्षित आणि लोकांमध्ये मिसळून काम करणाऱ्या नेतृत्वाची आज प्रभागाला नितांत गरज आहे, आणि इंजि. नितीश कापडणे हे त्यासाठी योग्य व्यक्ती आहेत.”
आगामी महापालिका निवडणुकीत त्यांनी उमेदवारी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत असून,
“अशाच कार्यक्षम आणि लोकाभिमुख नगरसेवकाची आम्हाला गरज आहे,”
अशी चर्चा सध्या संपूर्ण प्रभागात सुरू आहे.
सामाजिक जाण, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि नागरिकांशी सुसंवाद यामुळे इंजि. नितीश कैलास कापडणे हे प्रभाग क्र. 12 मधील लोकमान्य चेहरा बनत आहेत.

Social Plugin