फैजपूर – येथील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट) तर्फे इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज स्वीकारणे व मुलाखती घेण्याचा कार्यक्रम दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
फैजपूर शहरातील विविध प्रभागांतील पक्षाच्या इच्छुकांनी उमेदवारीसाठी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. या वेळी प्रदेश सरचिटणीस रवींद्र (नाना) पाटील, सावदा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, माजी उपनगराध्यक्ष व अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष शेख कुर्बान, जिल्हा सरचिटणीस विवेक ठाकरे, सचिन धांडे, जिल्हा उपाध्यक्ष नासिर शेख, शेख नासीर, शहराध्यक्ष रज्जाक शेख, कृष्णा चौधरी, भूपेंद्र सोनवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याबरोबरच स्थानिक पातळीवरील विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच उमेदवारांच्या पात्रता, पक्षनिष्ठा आणि जनसंपर्कातील सक्रियतेचा सखोल आढावा घेण्यात आला.

Social Plugin