अजिंठा लेणी येथे बौद्ध धम्म परिषदे निमित्त जळगाव जिल्हा सकल बौद्ध समाजातर्फे अन्नदान व पाणी वाटप कार्यक्रम

 


संभाजीनगर :दिनांक ५ नोव्हेंबर रोजी अजिंठा लेणी येथे भव्य २० वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात पार पडली. या परिषदेला भारतभरातून हजारो बौद्ध बांधव उपस्थित होते. विशेष म्हणजे या सोहळ्यास कोरियाचे माजी गव्हर्नर तसेच कोरियातील शेकडो बुद्ध भिक्षुक उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

या पवित्र प्रसंगी आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष व समाजरक्षक सतीश गायकवाड यांच्या अनमोल सहकार्यातून, तसेच जळगाव जिल्हा सकल बौद्ध समाजाच्या वतीने भव्य अन्नदान व पाणी बॉटल वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या उपक्रमांतर्गत हजारो उपस्थित बांधवांना अन्नदानासह केळी व पाण्याचे वाटप करण्यात आले.

विशेष म्हणजे या सेवाकार्यात गायकवाड परिवारातील सर्व सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. समाजसेवेची परंपरा जोपासत त्यांनी स्वतः उपस्थित राहून अन्नदान, पाणी वाटप व कार्यक्रम व्यवस्थापनात मोलाची भूमिका निभावली.

भोजन वाटप करताना सामाजिक कार्यकर्ते गौरव सतीश गायकवाड

कार्यक्रमात सकल बौद्ध समाज, जळगाव शहरातील तमाम समाज बांधव तसेच बुद्धिस्ट क्रिकेट लीग (BCL) जळगावचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यात पुढील मान्यवरांचे विशेष योगदान लाभले:

सतीश गायकवाड, किरण सोनवणे, दिलीप अहिरे, तृषाल सोनवणे, आशिष सपकाळे, गौरव गायकवाड, जीत सोनवणे, किरण झाल्टे, सचिन सरकटे सर, राजू डोंगरे, भारती रंधे, नीलू इंगळे, सागर अभिजीत रंधे, विक्रम रंधे, हरिओम सूर्यवंशी तसेच अनेक समाज बांधव उपस्थित होते.

या उपक्रमामुळे बौद्ध बांधवांमध्ये एकात्मता, दानशीलता व समाजसेवेचा संदेश प्रसारित झाला असून उपस्थितांनी आयोजक व गायकवाड परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन केले.