समता नगरात संविधानाचा जागरूकता सोहळा — संविधान प्रत वाटप कार्यक्रम

 



समता समाज मित्र मंडळ आणि ऑल इंडिया पँथर सेना यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त एक भव्य संविधान प्रत वाटप सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम समता नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

दिनांक: 26 नोव्हेंबर 2025 वेळ: सायंकाळी 6:00 वाजता ठिकाण: समता नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा

या कार्यक्रमाचे आयोजन ऑल इंडिया पँथर सेना महानगर अध्यक्ष राजू साळुंखे आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन अडकमोल यांनी केले असून, समाजातील बांधवांना संविधानाबद्दल जागरूकता आणि अधिकारांची ओळख करून देण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.

या निमित्ताने संविधानाच्या मूल्यांची जपणूक, समानता आणि सामाजिक बांधिलकी यांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचणार आहे.

सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला यशस्वी करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.