डोंगराळे प्रकरणाचा निषेध — पॅंथर सेनेकडून मुक्ताईनगर पोलिस ठाणे व तहसीलदारांना निवेदन

 


डोंगराळे येथील चिमुकलीवर घडलेल्या संतापजनक प्रकाराच्या निषेधार्थ आज मुक्ताईनगर पोलिस ठाणे तसेच तहसीलदार कार्यालय येथे ऑल इंडिया पॅंथर सेनेतर्फे निवेदन देण्यात आले.

या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लखन पानपाटील, उपजिल्हाध्यक्ष अजय शेलार, जिल्हा सचिव सागर बावसकर, शहराध्यक्ष प्रथमेश भास्कर, सोशल मीडिया प्रमुख समीर गाढे, तसेच राहुल पानपाटील, अतुल भाऊ, दीपक गाढे यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

पॅंथर सेनेने आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली असून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली.