अमित बघेल यांच्यावर कठोर कारवाई करा सिंधी जनरल पंचायत ट्रस्टची निदर्शने.


सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झुलेलाल यांच्याविषयी जोहर छत्तीसगड पार्टीचे अध्यक्ष  अमित बघेल यांनी आक्षेपार्ह विधान केले. यामुळे समस्त सिंधी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून बघेल यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पुज्य सिंधी जनरल पंचायत ट्रस्टने केली आहे.या संदर्भात जिल्हाप्रशासनाला निवेदन देण्यात आले.

तसेच कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली.निवेदनात म्हटले आहे की, अमित बघेल यांनी जाणूनबुजून सिंधी समाजाची धार्मिक भावना दुखावली आहे.त्यांनी केलेले आक्षेपार्ह वक्तव्य समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले असून यामुळे सिंधी समाजात तीव्र संताप दाटला आहे.तरी धार्मिक भावना दुखावणाऱ्या अमित बघेल यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली .यावेळी पुज्य सिंधी जनरल पंचायत ट्रस्टचे अध्यक्ष गुलशन उदासी , सचिव दुरुकुमार लखावाणी,हर्षकुमार रेलन,प्रकाश छेतिया, सुरेश कुंदनानी, रवी मोटवाणी,उत्तम वच्छाणी, गुरुमुख  वच्छाणी, मोहन सुखीया, मोहन दोदाणी, रामेशलाल चंदणाणी , रमेश मोटवाणी, निखिल मनवाणी, पंकज दुलाणी, रवी दुलाणी , सोनू ठकवाणी, ठाकूर नामकाणी, श्रीचंद केवलरामाणी , आदींसह सिंधी समाजबांधव उपस्थित होते.