अनिल अडकमोल यांची प्रभाग १२ (अ) मधून भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांमधे उत्साह

 

जळगाव | प्रतिनिधी

महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्र. १२ (अ) अनुसूचित जाती जागेसाठी अनिल अडकमोल यांची भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनिल अडकमोल हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महानगर अध्यक्ष असून महायुतीत निष्ठावंत म्हणून त्यांनी सातत्याने कार्य केले आहे.

अनिल अडकमोल यांनी सामाजिक प्रश्न, नागरी सुविधा, अन्यायाविरोधी लढे यासाठी वेळोवेळी आंदोलन, मोर्चे व निवेदने दिली आहेत. तळागाळातील नागरिकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे त्यांचे कार्य सर्वपरिचित असून, प्रभागातील नागरिकांशी त्यांचा थेट जनसंपर्क आहे.

रिपाई हा महायुतीतील घटक पक्ष असून भाजपने त्यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषतः अनुसूचित जाती समाजासह युवक वर्गात समाधान व्यक्त होत असून, प्रभाग १२ (अ) मधील निवडणूक लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.