आझाद समाज पार्टीच्या (कांशीराम) वतीने महामानवाला अभिवादन

 


महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जळगाव शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात उभारण्यात आलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्यास आझाद समाज पार्टीच्या (कांशीराम) वतीने पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. सामाजिक न्याय, समता आणि बंधुत्वाच्या विचारांचे स्मरण ठेवत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना कृतज्ञतापूर्वक मानवंदना अर्पण केली.


या कार्यक्रमास आझाद समाज पार्टीचे (कांशीराम) जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, युवा महानगराध्यक्ष मोनू अडकमोल, तसेच योगेश तायडे, चेतन नन्नवरे, शुभम पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी मिळून बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी बाबासाहेब आणि मान्यवर कांशीराम साहेब यांनी दाखवलेल्या मार्गावर ठामपणे चालण्याचा निर्धार व्यक्त केला.


पदाधिकाऱ्यांनी समाजातील वंचित, दुर्बल आणि शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटन, शिक्षण आणि संघर्ष या त्रिसूत्रीचा आग्रह धरत कार्य करण्याचे व समाजात जागृती निर्माण करण्याचे आवाहन केले.

जळगाव शहरातील नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करून बाबासाहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.