प्रभाग क्र. 14 मधून सौ. अर्चना मिलिंद सोनवणे यांची भाजपकडे उमेदवारीसाठी मागणी

 


जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १४ मधून उच्चशिक्षित व सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या सौ. अर्चना मिलिंद सोनवणे यांनी भारतीय जनता पक्षाकडे अधिकृत उमेदवारीसाठी मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन समस्या, नागरी सुविधा, महिला सक्षमीकरण आणि युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख काम करण्याचा त्यांचा मानस आहे.

मिलिंद सोनवणे : सामाजिक व राजकीय चळवळीतील सक्रिय नेतृत्व

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनवणे हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात सातत्याने सक्रिय आहेत. विविध जनहिताच्या प्रश्नांवर त्यांनी आंदोलन, मोर्चे, निवेदने व लढ्यांचे नेतृत्व केले असून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले आहे.

विशेष म्हणजे अल्पसंख्यांक, आदिवासी समाज, शोषित-पीडित, कामगार, मागासवर्गीय व दलित समाजाच्या न्याय हक्कांसाठी ते सातत्याने लढा देत असतात. अन्यायाविरुद्ध ठाम भूमिका, थेट जनसंपर्क आणि संघर्षशील नेतृत्वामुळे तरुण, कामगार व वंचित घटकांमध्ये त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.

सामाजिक, शैक्षणिक व महिला कार्यात सक्रिय सहभाग

सौ. अर्चना सोनवणे या उच्चशिक्षित असून संस्कार संस्कृती फाउंडेशनच्या अध्यक्षा, महिला दक्षता समितीच्या सदस्या तसेच भारतीय जनता पक्षाच्या बूथ सदस्य म्हणून सक्रियपणे कार्यरत आहेत.

संस्कार संस्कृती फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा, विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक मार्गदर्शन, समुपदेशन, तसेच सामाजिक जनजागृतीचे उपक्रम प्रभावीपणे राबवले आहेत. महिलांचे हक्क, शिक्षण व स्वावलंबन यासाठी त्यांचे कार्य उल्लेखनीय मानले जाते.

प्रभाग १४ च्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्धता

प्रभाग क्रमांक १४ मधील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, महिला व युवकांसाठी योजना तसेच सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर प्रभावी काम करण्याचा संकल्प सौ. अर्चना सोनवणे यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभागात नवे नेतृत्व, उच्चशिक्षित महिला प्रतिनिधित्व आणि सकारात्मक बदल अपेक्षित आहेत.