प्रभाग १२ (अ) साठी इच्छुक : सेवेचा ध्यास व स्वच्छ प्रतिमेसह डॉ. क्षितिजचंद्र दाजीबा भालेराव मैदानात

 



जळगाव (प्रतिनिधी) :

जळगाव महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १२ (अ) मधून निवडणूक लढविण्यासाठी डॉ. क्षितिजचंद्र दाजीबा भालेराव इच्छुक असल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे आणि सेवाभावी भूमिकेमुळे ते नागरिकांमध्ये ओळखीचे नाव बनले आहे.

डॉ. क्षितिजचंद्र दाजीबा भालेराव हे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे जळगाव येथील मा. सरचिटणीस असून ते महानगर कार्यकारिणी सदस्य व मा. महानगर चिटणीस म्हणूनही जबाबदारी पार पाडत आहेत. सन २०१९ पासून ते भाजपच्या संघटनात्मक व सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.

बी.एच.एम.एस. (BHMS) पदवीधर असलेले डॉ. भालेराव हे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले असून त्यांना कोणताही राजकीय वारसा नाही. लोकसेवा व रुग्णसेवा हाच त्यांचा मुख्य ध्यास आहे.

कोरोना महामारीच्या काळात त्यांनी “कोरोना योद्धा” म्हणून अत्यंत जोखीम पत्करून कार्य केले. शेकडो रुग्णांसाठी बेड, ऑक्सिजन व अँब्युलन्सची व्यवस्था करून देत अनेक कुटुंबांना आवश्यक औषधे व साहित्य उपलब्ध करून दिले. त्यांच्या वेगवान निर्णयक्षमतेमुळे त्या कठीण काळात अनेकांचे प्राण वाचले. त्यांच्या या निःस्वार्थ सेवाकार्याची आजही शहरभरात प्रशंसा केली जाते.


स्वच्छ प्रतिमा, सेवाभाव, शिस्तबद्ध कार्यशैली आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी नेहमी उपलब्ध राहण्याची वृत्ती यामुळे डॉ. क्षितिजचंद्र दाजीबा भालेराव हे प्रभाग १२ (अ) मधील नागरिकांसाठी एक विश्वासार्ह, सक्षम आणि भविष्याभिमुख पर्याय म्हणून पुढे येत आहेत. त्यांच्या इच्छुकतेमुळे आणि कार्यक्षमतेमुळे परिसरात सकारात्मक चर्चा अधिकच बळावत आहे.