जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेना (आनंदराज आंबेडकर) पक्षाच्या वतीने प्रमोद रामदास इंगळे यांनी प्रभाग क्रमांक ७ (जनरल) तसेच प्रभाग क्रमांक १० (अनुसूचित जाती राखीव) मधून इच्छुक उमेदवार म्हणून आपली तयारी दर्शविली आहे.
उच्चशिक्षित व शेती व्यवसायात सक्रिय
प्रमोद रामदास इंगळे हे उच्चशिक्षित असून त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शेती क्षेत्रातील अनुभवासोबतच सामाजिक प्रश्नांबाबतची जाण, सर्वसामान्य जनतेशी असलेला थेट संपर्क आणि प्रशासनाची समज हे त्यांचे प्रमुख बलस्थान मानले जाते.
प्रशासकीय व शैक्षणिक पार्श्वभूमीचा वारसा
त्यांचे वडील स्व. रा. ज. इंगळे हे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते. तर भाऊ डॉ. अजयकुमार इंगळे हे बी.एड. कॉलेज, जामनेर येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. कुटुंबातील प्रशासकीय व शैक्षणिक पार्श्वभूमीचा लाभ समाजकार्य व सार्वजनिक जीवनात घेण्याचा त्यांचा मानस आहे.
कायदेविषयक जाण असलेली पुढील पिढी
त्यांचा मुलगा अँड.लक्षराज प्रमोद इंगळे हा वकील असून, कायदेविषयक ज्ञानामुळे सामाजिक व नागरी प्रश्न प्रभावीपणे मांडण्याची क्षमता कुटुंबाला लाभली आहे.
रिपब्लिकन सेनेतून विकासाभिमुख भूमिका
रिपब्लिकन सेना (आनंदराज आंबेडकर) पक्षाच्या विचारसरणीशी निष्ठा ठेवत, सामाजिक न्याय, समानता, मूलभूत सुविधा, शिक्षण आणि शेतकरी हित या मुद्द्यांवर काम करण्याची भूमिका प्रमोद रामदास इंगळे यांनी मांडली आहे. प्रभागातील नागरिकांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असून पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Social Plugin