प्रभाग ११ मधून भाजपकडे इंजि. गिरीश कैलास भोळे यांची उमेदवारीची मागणी सामाजिक-धार्मिक कार्यातून उभे राहिलेले नेतृत्व; भोळे परिवाराची भक्कम पार्श्वभूमी

 


जळगाव (प्रतिनिधी) – आगामी जळगाव महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ११ मधून निवडणूक लढविण्याचा मानस व्यक्त करत इंजि. गिरीश कैलास भोळे यांनी भारतीय जनता पक्षाकडे अधिकृत उमेदवारीची मागणी केली आहे. ते सर्वसाधारण गटातून उमेदवारीस इच्छुक असून, त्यांच्या निर्णयामुळे प्रभागातील राजकीय वातावरणात हालचालींना वेग आला आहे.

इंजि. गिरीश कैलास भोळे हे जळगाव जिल्ह्यात सामाजिक, धार्मिक व सार्वजनिक क्षेत्रात परिचित असलेल्या भोळे परिवारातील आहेत. ते कै. किरण पंडितराव भोळे (माजी नगरसेवक) यांचे पुतणे असून, भोळे परिवाराने शहराच्या सामाजिक-धार्मिक आणि विकासात्मक कार्यात नेहमीच सक्रिय सहभाग घेतला आहे.

त्यांचे वडील कैलास पंडितराव भोळे हे म्हाळसादेवी देवी संस्थानचे अध्यक्ष असून, धार्मिक व सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. तसेच पोस्टल कॉलनी येथील श्री हरी मंदिर प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक विकासात्मक कामे मार्गी लावली आहेत. याशिवाय जागृती हौसिंग सोसायटीतील मारुती मंदिराच्या उभारणीसाठीही भोळे परिवाराचा मोलाचा वाटा असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.

कुटुंबातील सामाजिक सेवेला पुढे नेत कोविड काळात त्यांची बहीण डॉ. पूजा कैलास भोळे (MBBS) यांनी रुग्णसेवा केली, तर भाऊ डॉ. भाग्येश कैलास भोळे (MBBS) वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. मोठे काका सुनील पंडितराव भोळे हे मनपा अभियंता म्हणून कार्यरत आहेत.

स्वतः इंजिनियर असलेले इंजि. गिरीश भोळे हे सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय असून विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजहितासाठी सातत्याने कार्य करत आहेत. प्रभाग क्रमांक ११ मधील मूलभूत सुविधा, नागरिकांच्या समस्या व सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपकडून उमेदवारी मिळाल्यास सामाजिक-धार्मिक कार्याची पार्श्वभूमी आणि तरुण नेतृत्वाचा संगम प्रभाग ११ च्या विकासाला नवी दिशा देईल, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.