प्रभाग १२ (अ) साठी इंजि. नितीश कापडणे यांची भाजपकडून उमेदवारीची मागणी.

 


भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीवर निष्ठा ठेवून समाजहितासाठी कार्य करणारे इंजि. नितीश कैलास कापडणे हे जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक १२ (अ) – अनुसूचित जागेसाठी पक्षाकडे उमेदवारीची अधिकृत मागणी करणारे एक सशक्त व विश्वासार्ह इच्छुक म्हणून पुढे आले आहेत. पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांशी एकरूप राहून त्यांनी केलेले काम आज नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.


सुशिक्षित, अभ्यासू आणि जनतेशी थेट नाते जपणारे इंजि. कापडणे हे सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. वेळेवर मदत, प्रामाणिक कार्यपद्धती आणि सातत्यपूर्ण लोकसंपर्क यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांच्या कार्याबाबत सकारात्मक भावना झपाट्याने वाढताना दिसत आहे. विशेषतः युवक वर्ग आणि कुटुंबप्रमुख यांच्याकडून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.


राज्याचे मंत्री मा. गिरीश महाजन व आमदार राजुमामा भोळे यांच्या सहकार्याने त्यांनी अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मुंबई येथे नेऊन मोफत शस्त्रक्रिया व उपचारांची सुविधा उपलब्ध करून दिली. रुग्णांचे उपचार, प्रवास, औषधोपचार तसेच नातेवाईकांची व्यवस्था स्वतः लक्ष घालून पूर्ण केल्यामुळे त्यांच्या कार्याची नागरिकांमध्ये मोठ्या आदराने दखल घेतली जात आहे. समाजातील विविध घटकांशी त्यांनी जपलेले जिव्हाळ्याचे संबंध त्यांना मजबूत आधार देत आहेत.


कोरोना महामारीच्या संकटकाळात त्यांनी कोरोना योद्धा म्हणून जीवाची पर्वा न करता अनेक कुटुंबांना आधार दिला. बेड, ऑक्सिजन, रुग्णवाहिका आणि जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करून देत त्यांनी शेकडो लोकांचे प्राण वाचवले. त्या काळातील त्यांची तत्परता, निर्णयक्षमता आणि सेवाभाव आजही नागरिकांकडून गौरवाने आठवला जातो.


व्यवसायाने अभियंता असलेले इंजि. नितीश कापडणे हे शांत, संयमी आणि प्रगत विचारांचे युवा नेतृत्व आहे