प्रभाग १४ ब : सौ. अर्चना मिलिंद सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; अपक्ष विजयाची चर्चा

 


जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १४ ब मधून सौ. अर्चना मिलिंद सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जरी पक्षाची अधिकृत उमेदवारी (टिकीट) मिळाले नसले, तरी जनतेने आजवर दिलेल्या विश्वासाच्या बळावर त्या निवडून येतील, असा ठाम विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.

सौ. अर्चना सोनवणे यांचे पती मिलिंद सोनवणे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे युवा जिल्हाध्यक्ष आहेत. दलित, शोषित व वंचित समाजावर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांविरोधात त्यांनी सातत्याने आंदोलन, मोर्चे व विविध जनआंदोलने उभारली असून, त्यांच्या सामाजिक कार्याची दखल नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर घेतली जाते.

याच सामाजिक बांधिलकीचा आणि जनतेशी असलेल्या थेट संपर्काचा फायदा सौ. अर्चना सोनवणे यांना होणार असल्याची चर्चा प्रभागात सुरू आहे. त्यामुळे अपक्ष म्हणूनही त्यांना भरघोस मतदान होऊन त्या विजयी ठरतील, असा विश्वास राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.