प्रभाग १३ (अ) मध्ये राजकीय समीकरणे बदलणार?.* कार्यकर्ते, समर्थक व नागरिकांच्या इच्छेने विनोद चौधरी अपक्ष मैदानात.

 



जळगाव | प्रतिनिधी

जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३ (अ) मधून विनोद चौधरी यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा ठाम निर्णय घेतल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाकडून त्यांचे तिकीट कापण्यात आले असून, तरीही त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे आता प्रभाग १३ मधील चुरस अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

युवा उद्योजक व युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले विनोद चौधरी हे सामाजिक, शैक्षणिक तसेच धार्मिक कार्यात सातत्याने सक्रिय आहेत. विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांमुळे प्रभागात त्यांची लोकप्रियता लक्षणीयरीत्या वाढली असून, त्यांच्या कार्याची दखल घेत कार्यकर्ते, समर्थक तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांकडूनही “तुम्ही अपक्ष लढावे” अशी तीव्र इच्छा व चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे.

प्रभागातील विविध घटकांकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे त्यांच्या अपक्ष उमेदवारीने इतर राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे राजकीय गणित बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आता विनोद चौधरी यांच्या अधिकृत घोषणेकडे आणि पुढील रणनीतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.