जळगाव :महानगरपालिका निवडणुकीत ४६ पैकी सर्व ४६ जागांवर घवघवीत यश मिळवलेल्या भाजपने महापालिकेतील गटनेतृत्व जाहीर केले आहे. भाजपच्या गटनेतेपदी प्रकाश ऊर्फ पिक्की रावलमल बालाणी यांची निवड करण्यात आली असून, उपगटनेतेपदी नितीन बरडे तर प्रतोदपदी डॉ. चंद्रशेखर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नाशिक येथे झालेल्या बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांनी या नियुक्त्यांची घोषणा केली. त्यानंतर प्रभारी विभागीय आयुक्त आयुष प्रसाद यांच्याकडे भाजप गटाची अधिकृत नोंदणी करण्यात आली.
पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या प्रकाश बालाणी यांच्यावर गटनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यापूर्वी त्यांचे बंधू भगत बालाणी यांनी गटनेतेपद भूषविले होते. मात्र ते अपात्र ठरल्याने यंदा त्यांनी भावाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. आता पुन्हा एकदा गटनेतेपद बालाणी परिवाराकडेच राहिले आहे.

Social Plugin