जळगाव | प्रतिनिधी
तेली प्रदेश महिला मंडळ जळगाव व शारदा एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संक्रांत सणानिमित्त तेली समाजातील महिला भगिनींसाठी भव्य-दिव्य हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास जळगाव शहरातील साधारण ५०० तेली समाजातील महिलांची उपस्थिती लाभली.
सदर कार्यक्रमात महिलांसाठी विविध प्रकारचे मार्गदर्शनपर उपक्रम तसेच मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले. सतत घर व कामाच्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असणाऱ्या महिलांना विरंगुळा मिळावा व समाजातील महिलांमध्ये एकोपा वाढावा, या उद्देशाने हा कार्यक्रम शाळा क्रमांक ३, पांझरा पूर टाकीजवळ आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमादरम्यान महिलांना विविध प्रकारची बक्षिसे तसेच वाण देण्यात आले. हा कार्यक्रम तेली समाज महिला महानगराध्यक्ष सौ. मनीषा प्रदीप चौधरी तसेच निर्मलाताई चौधरी व बेबाबाई सुरेश चौधरी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनंदाताई चौधरी, डॉ. सुषमा चौधरी व डॉ. सुजाता प्रदीप चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रिया चौधरी, आशा चौधरी, मेघा चौधरी, सारिका चौधरी, प्रतिभा चौधरी व कविता चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Social Plugin