जळगाव | प्रतिनिधी
महानगरपालिका निवडणुका जवळ येत असताना शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रभाग क्रमांक १२ ‘अ’ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अधिकृत उमेदवार ललितकुमार घोगले यांनी प्रचारात आघाडी घेतली असून, महाबळ व रामानंद नगर परिसरात त्यांना नागरिकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसत आहे.
घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत घोगले यांनी परिसरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, तसेच नागरी सुविधांबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली. प्रचारफेरीदरम्यान महिलांपासून तरुणांपर्यंत सर्व घटकांचा सहभाग लक्षणीय ठरला. “विकासाभिमुख आणि लोकाभिमुख नेतृत्वाची गरज आहे,” अशी भावना अनेक मतदारांनी व्यक्त केल्याचे सांगितले जाते.
एकंदर पाहता, महाबळ–रामानंद नगर भागात उमेदवार घोगले यांच्या प्रचाराला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेची साक्ष देत असून, आगामी निवडणुकीत हा जनसमर्थनाचा कौल निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Social Plugin