सागर पार्क येथील शौचालयाच्या घाण पाण्यामुळे नागरिक त्रस्त नगरसेविका सौ. गायत्री इंद्रजित राणे यांचे महापौरांकडे निवेदन

 


शहरातील सागर पार्क परिसरातील सार्वजनिक शौचालयाचे घाण पाणी थेट मैदानावर सोडले जात असल्याने दुर्गंधी पसरत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रभाग क्र. १२ मधील रहिवाशांकडून याबाबत नगरसेविका सौ. गायत्री इंद्रजित राणे यांच्याकडे सातत्याने तक्रारी येत होत्या. विशेषतः सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना अस्वच्छतेमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर नगरसेविका सौ. गायत्री इंद्रजित राणे यांनी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांकडे तात्काळ कार्यवाहीची मागणी केली. तसेच सागर पार्कच्या विविध समस्यांबाबत महापौर दीपमाला काळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपचे सरदार वल्लभभाई पटेल मंडल 3 चे अध्यक्ष अजित राणे उपस्थित होते 

महापौरांनी सदर प्रकरण गांभीर्याने घेत त्वरित समस्या निकाली काढण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. लवकरात लवकर शौचालयाच्या सांडपाण्याची योग्य व्यवस्था करून मैदान स्वच्छ व दुर्गंधीमुक्त करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

नागरिकांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.