वाघ नगर, जिजाऊ नगर येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या नियोजनासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सार्वजनिक वाघ नगर जयंती समितीच्या अध्यक्षपदी मनोज अडकमोल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपस्थित समाजबांधवांनी टाळ्यांच्या गजरात मनोज अडकमोल यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
बैठकीत इतर पदाधिकाऱ्यांचीही निवड जाहीर करण्यात आली. कार्याध्यक्षपदी चंद्रमणी सोनवणे, उपाध्यक्षपदी सुमित भाऊ जाधव, कोषाध्यक्षपदी सहदेव वाघ, सरचिटणीसपदी महेश भाऊ अडकमोल तर सल्लागारपदी देविदास काका सोनवणे यांची निवड करण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांनी मनोज अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली जयंती उत्सव भव्य, शिस्तबद्ध व प्रेरणादायी स्वरूपात साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या बैठकीस युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. चेतन बागुल, सागर सुरवाडे, मिलिंद बोदडे, योगेश भालेराव सर, लक्ष्मण सरवदे, हरीश गजरे, रोहित मनोरे, मनोज भालेराव, राकेश कांबळे, राजू सपकाळे, भालेराव बाबा यांसह अनेक समाजबांधव उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी सर्वांनी एकत्र येत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्याचा तसेच जयंती उत्सव सामाजिक ऐक्य व एकजुटीने

Social Plugin