जळगाव शहरातील आशाबाबा नगर गट नं. ८७, कोल्हे नगर, परिसरातील पश्चिम अथर्व कॉलनीच्या मागील बाजूस आज 21 फेब्रुवारी 2026 रोजी संपूर्ण नाल्यांची साफसफाई करण्यात आली. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने व स्वच्छता राखण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली.
प्रभाग क्र. ७ च्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ. अंकिता पंकज पाटील यांनी “पहिले आरोग्य” या भूमिकेतून तात्काळ पुढाकार घेत हा प्रश्न मार्गी लावला. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत त्वरित कारवाई केल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी त्यांचे पती व सामाजिक कार्यकर्ते पंकज पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून कामाची पाहणी केली व संपूर्ण साफसफाई व्यवस्थितपणे पूर्ण करून घेतली.
नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत तत्परतेने काम करणाऱ्या अंकिता पाटील यांच्या कार्याची परिसरात प्रशंसा होत आहे.

Social Plugin