समतानगर डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी दादा राठोड तर उपाध्यक्षपदी प्रताप बनसोडे

 


जळगाव : भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर समतानगर येथे बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान नगरसेवक अनिल अडकमोल यांनी भूषविले.

या वेळी समता समाज मंडळाच्या वतीने समतानगर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी दादाराव राठोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच सचिवपदी रवि सोनवणे, उपाध्यक्षपदी प्रताप बनसोडे आणि खजिनदारपदी मुकेश टिल्लोरे यांची निवड करण्यात आली.

बैठकीस राजेश साळुंखे, हरीश शिंदे, बबलू शिंदे, भीमराव सोनवणे, सचिन अडकमोल, शांताराम सुरवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांच्या एकमताने ही निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.